From village playgrounds to Olympic medals
Townsol Admin
May 29, 2025
वातल्या मैदानी खेळापासून ऑलिंपिक पदकापर्यंत
बॅडमिंटन हा खेळ आता केवळ शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा खेळ ताकद, लवचिकता आणि वेग यांचा संगम आहे. भारतात प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंनी जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
बॅडमिंटन केवळ खेळ नसून, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. ग्रामीण भागात देखील याचा प्रसार झाल्यास, फिटनेस, फोकस आणि स्पर्धा कौशल्ये लहान वयातच विकसित होतील.
पण अडथळे अजून आहेत........
1) पुरेश्या मैदानी व इनडोअर सुविधा नाहीत
गावांमध्ये खेळण्यासाठी मैदानांची कमतरता असून अनेक ठिकाणी पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात सराव करणे अशक्य होते. इनडोअर कोर्ट्सची उपलब्धता फारच मर्यादित आहे. त्यामुळे खेळाडूंचा सराव खंडित होतो आणि त्यांची गुणवत्ता वाढत नाही.
2) प्रशिक्षकांची कमतरता
खेळात कौशल्य मिळवण्यासाठी मार्गदर्शक प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण ग्रामीण भागात पात्र प्रशिक्षकांची व अनुभवी मार्गदर्शकांची उपलब्धता कमी असल्यामुळे तरुण खेळाडूंना योग्य तंत्र शिकण्याची संधी मिळत नाही.
3) स्पर्धा व मंचाची अनुपस्थिती
स्थानिक किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा नियमित होत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करायची संधी मिळत नाही आणि पुढील टप्प्यावर निवड होण्याची शक्यता कमी होते.
4) शाळांमध्ये खेळाला कमी प्राधान्य
गावपातळीवरील बहुतांश शाळांमध्ये आजही खेळाला दुय्यम स्थान दिलं जातं. कागदोपत्री ‘खेळाचा तास’ असतो पण प्रत्यक्षात खेळ होत नाही. यामुळे लहान वयातच मुलांच्या मनात खेळाबद्दल गोडी निर्माण होत नाही.
{{heading_text}}
View all
Looks like there are no topics for this forum. Suggest topic