कोकणातील तरुणांना नवीन प्रकारच्या उद्योगाची संधी !

Townsol Admin

May 10, 2025

कोकणातील आंब्याच्या व्यवसायात बऱ्याच अडचणी आहेत त्यापैकी एक ज्वलंत प्रश्न म्हणजे झाडावरून आंबे उतरवायला माणसे मिळत नाहीत. बाकीचे प्रश्न निसर्गाच्या परिस्थितीमुळे निर्माण होत असल्यामुळे त्यावर आपल्याकडे कदाचित मर्यादित उपाय असू शकतात पण हा प्रश्न संपूर्णपणे मानवनिर्मित असल्यामुळे खात्रीचा तोडगा नक्कीच असायला हवा. 

हा कदाचित मोठ्या बागायतदारांचा प्रश्न नसू शकेल कारण त्यांना अशा कामाकरिता  कायम स्वरूपी माणसे मासिक पगारावर ठेवणे परवडू शकते परंतु हा प्रश्न छोट्या आंबा झाड मालकांना कि ज्यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी झाडे आहेत, त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. 

आपण हा विशिष्ट प्रश्न सहजपणे सोडवू शकतो असे मला वाटते. तो कसा हे मी तुम्हाला इथे सांगतो. 

तालुका पातळीवर खालील प्रकारचा नवीन उद्योग सुरू करायचा कि जेणेकरून गावातील प्रत्येक म्हणजे अगदी एका झाडाचा मालक सुद्धा  त्याचा आंबा हा शहरातील बाजारपेठेत विकायला  पाठवू  शकेल. 

उद्योगाचे स्वरूप  - आंबा व्यवस्थापन - मोहोर ते विक्री (झाड तुमचे उद्योग आपला)

Mango Management Service Provider - Pluck, Pack, Ship and Sell 

ज्यांच्याकडे केवळ एक किंवा दोनच झाडे असतील अशा झाड मालकांना  त्या आंब्यांचे व्यापारीकरण आणि  व्यवस्थापन करणे हे पैशाच्या दृष्टीने व्यावहारिक होत नाही त्यामुळे कोकणातील कितीतरी चांगल्या प्रतीचे आंबे बाजारात न येता  झाडावरच सडून  जात असावेत. म्हणूनच कोकणच्या मेव्याचे (आंबा आणि इतर फळे) पूर्णपणे व्यापारीकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या सेवा उद्योगाची जरुरी आहे. 

गावातील ५ -६ तरुण मंडळी एकत्र येऊन हा सेवा उद्योग सुरु करू शकतात आणि गावातील प्रत्येक झाडाला आणि फळाला पूर्ण न्याय देऊ शकतात

सेवा १ - योग्य वेळेवर औषधाची  फवारणी करणे

सेवा २ - आधुनिक शिडीचा वा\पार करून आंबा झाडावरून अलगद उतरवणे ( शिडी भाड्याने सुद्धा दुसऱ्याला देता येईल )

सेवा ३ - उतरवला गेलेला आंबा पेटीमध्ये भरून तो बाजारपेठेत मागणीनुसार  विकायला पाठवणे. (मंडई, सोसायटी, घरपोच वैगेरे)

सेवा ४ - आंबा विकून आलेले  पैसे आंबा झाड मालकाला बँकेमार्फत देणे. 

हा व्यवसाय तालुक्यातील तरुण वर्ग आणि झाड मालक विक्रीच्या किमतीमध्ये भागीदारी तत्वावर करू शकतात. 

ह्या व्यवसायाचे अतिरिक्त फायदे : 

१. हा उद्योग कोकणातील प्रत्येक तालुक्यात किमान ५ - १० तरुणांना उत्पनाची संधी उपलब्ध करेल. 

२. आंब्याचे केवळ एक झाड असले तरी मालकाला त्याचे आंबे बाजारभावानुसार विकता  येतील. 

३. ही सुविधा असल्यामुळे कोकणातील प्रत्येक जमीनधारक जास्तीत जास्त आंब्याचे व इतर फळांची झाडे लावायला लागतील. 

ह्या संकल्पनेबद्दल जर कुणाला अधिक माहिती हवी असल्यास TownSol शी संपर्क साधावा किंवा इथे comment  लिहा.

Share your thoughts in the comments below.

Create an account to write a response.

District Vision
Partner